रांजणगाव MIDC मधील हाय फिजिक्स कंपनीतील मॅनेजर, लाखो रुपयांची फसवणूक करून झाला फरार : पोलीस घेत आहेत त्याचा शोध

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
रांजणगाव : दि. 26/08/2021

       पुणे जिल्ह्यातील पंचतारांकित MIDC रांजणगाव गणपती येथील, हाय फिजीक्स या कंपनीत HR Manager म्हणून कामाला असताना, त्याने एप्रिल 2017 ते मे 2021 या कालावधीत, लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या भामट्याचे नाव व पत्ता समीर श्याम कुलकर्णी, मूळ रा. तक्षशिला अपार्टमेंट, फ्लॅट क्र. 6, शालिमार, नाशिक 422001 (महाराष्ट्र) असे आहे.
हाय फिजिक्स कंपनीकडून काही इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व इतर काही उपकरणांची तपासणी करून, टेस्ट रिपोर्ट व सर्टिफिकेट दिले जाते.

       सदरच्या व्यक्तीने या कंपनीमध्ये कामाला असताना, कंपनीच्या नावाची बनावट व खोटी कागदपत्रे वापरून, ग्राहकांना बनावट टेस्ट रिपोर्ट देऊन, स्वतःचा आर्थिक फायदा करत, कंपनी व कंपनी प्रशासनाची आर्थिक फसवणूक करून बदनामी केल्यामुळे, कंपनी प्रशासनाने या व्यक्ती विरुद्ध रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे, 298/2021 भा द वि कलम 406, 409, 420, 468, 471, 473, 500 असे गुन्हे दि. 13 ऑगस्ट 2021 रोजी नोंदविलेले आहेत.
तसेच या आधीही जळगाव येथील एका कंपनित फसवणूक केल्याप्रकरणी, या व्यक्तीवर गुन्हा दाखल आहे.
सदर व्यक्ती ही, कंपनीची मोठी आर्थिक फसवणूक करून फरार झाला आहे. पोलीस या फरार व्यक्तीचा शोध घेत असून नाशिक पोलिसांनाही सदर व्यक्तीचा शोध घेण्याचे पत्र दिले असून, ही व्यक्ती जर कुणाला दिसली किंवा या व्यक्तीबद्दल कुणाला काही माहिती असेल, तर पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आलेय.
पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप निरीक्षक विनोद शिंदे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *