राज्यात लवकरच पहिल्या टप्यात ५२०० पदे भरणार, त्यातील ७२० पदे पिंपरी चिंचवडला मिळणार – गृहमंत्री दिलीपराव वळसे पा.

प्रतिनिधी : लक्ष्मण दातखिळे
दि. १७ जुलै २०२१
ठिकाण : पिंपरी – चिंचवड
————
राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी शनिवारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान वाढती गुन्हेगारी आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या जागेसंदर्भात आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
               यावेळी गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले कि ” कोरोना परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक कारागृहात कैद्यांसाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या सर्व उपाययोजना करण्याच्या संदर्भात सूचना दिल्या आहेत. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कारागृहातील नियोजन करण्यासाठी काही कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यकाळामध्ये हा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्रामध्ये काही नवीन कारागृहाची निर्मिती करणे गरजेचे आहे याची मागणी आज करण्यात आली.


आज बैठकीत सर्व बाबींचा आढावा घेण्यात आला. प्रामुख्याने पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या इमारतीसाठी जागा मिळवण्यासाठी कालच पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहे. आणि चिखलीला ४ एकर जागा देण्यासंदर्भात निर्देशित केले आहे. सर्व सुविधांयुक्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची इमारत उभारण्यात येतील. तसेच पोलीस कॉन्स्टेबल ची राज्यभरात पहिल्या टप्यात ५२०० पदे आणि दुसऱ्या टप्यात ७००० पदे लवकरच भरणार असल्याचे देखील गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले. पहिल्या टप्यातील भरती मध्ये पिंपरी चिंचवड च्या वाट्याला ७२० पोलीस कॉन्स्टेबल मिळणार आहे आहेत.
                         पिंपरी – चिंचवड मधील वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन पोलीस आयुक्त आणि त्यांच्या सर्व सहकारी अधिकाऱ्यांना गुन्हेगारी कमी करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेऊन नागरिकांनी अनावश्यकपने रस्त्यावर फिरू नये, कोविड च्या नियमांचे सर्वांनी पालन करण्याचे नागरिकांना आवाहन देखील वळसे पाटील यांनी केले. नागरिक आणि पोलिसांमधील संवाद वाढावा यासाठी प्रत्येक महिन्याला प्रत्येक पोलीस स्टेशन च्या प्रमुख्याने जनता दरबार घेऊन नागरिकांच्या कैफियत ऐकून घेतल्या पाहिजे आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सामान्य माणसाचा पोलिसांवरचा विश्वास कशा प्रकारे वाढेल आणि हाच विश्वास कसा दृढ होईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत हि आमची सर्वांची भूमिका असल्याचे देखील गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *