दि. १५ घोडेगाव :
आंबेगाव ब्युरोचिफ मोसीन काठेवाडी
घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी डी काळे महाविद्यालयातील मराठी विभाग आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने नुकतेच ऑनलाईन गझल व काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आय. बी.जाधव हे होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड.संजय आर्विकर यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गझलकार प्रा.डाॅ. जयसिंग गाडेकर (आळे), श्री.समाधान गायकवाड (सोलापूर ), आणि श्री. राम गायकवाड ( औरंगाबाद ) इत्यादींनी आपल्या गझलांचे व मुशायरांचे सादरीकरण करून उपस्थित रसिक श्रोत्यांची मने जिंकली.
महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील प्रा. डाॅ. प्रभाकर मोकळ, प्रा.डॉ. गुलाबराव पारखे, श्री.विनोद काळे याचबरोबर कु.ऋतुजा येवले या विद्यार्थिनीने कविता सादर केली. या कार्यक्रमाचा समारोप उपप्राचार्य प्रा. बी. एम.पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ ज्ञानेश्वर वाल्हेकर यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.पोपट माने यांनी केले आणि आभार प्रा.डाॅ. पुरुषोत्तम काळे यांनी मानले.