मराठी चित्रपट निर्मात्यांच्या पाठीशी सरकारचे पाठबळ उभे करु – नाना पटोले

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
१८ नोव्हेंबर २०२१

मुंबई


कोरोना महामारीच्या संकटामुळे चित्रपट निर्माते व रंगकर्मी यांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठी चित्रपट निर्मात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु महा विकास आघाडी सरकार मराठी चित्रपट निर्मात्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील व त्यांना सर्व ताकद देऊ, असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. मराठी चित्रपट निर्मात्यांची बैठक टिळक भवन, मुंबई येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते.
सांस्कृतीक कार्य मंत्री अमित देशमुख यावेळी बोलताना म्हणाले की, चित्रपटांना उद्योगाचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा विचार असून त्यादृष्टीने काम सुरु आहे. उद्योगाचा दर्जा मिळाल्यास अनेक सवलतीही मिळतील. नाशिकमध्ये चित्रनगरी निर्माण करण्याचा सरकारचा विचार आहे. तसेच विदर्भातही एक चित्रनगरी उभी रहावी यासाठी प्रयत्न करणार आहोत.

मराठी चित्रपट निर्मात्यांच्या मागण्या तत्वतः मान्य – अमित देशमुख

आज ज्या मागण्यांचे निवेदन दिले आहे त्या सर्व मागण्या तत्वतः मान्य असून चित्रपटांना अनुदानही दिले जाईल व इतर मागण्यांवरही निर्णय घेतला जाईल. चित्रपट व नाट्यगृहांना परवानगी देताना ५० टक्के प्रक्षेकांची परवानगी दिली आहे. ती १०० टक्के देण्यासाठी प्रयत्न करु. एकपडदा चित्रपटगृहाबद्दल एक सर्वंकष धोरण ठरवले जात आहे. तसेच मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करावेत यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन देशमुख यांनी दिले. या बैठकीला प्रदेश काँग्रेसच्या सांस्कृतीक सेलच्या अध्यक्षा विद्या कदम, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस देवानंद पवार, सचिव राजाराम देशमुख, तजेला बगाडे, यशवंतसिंग, विष्णु शिंदे, देवेंद्र मोरे, बाळासाहेब गोरे, विजय राणे, विकास तांबे, शारदा जगताप, जेसाभाई मोटवाणी, शिरीष राणे, रमेश साळगावकर, फरजाना डांगे, दाऊद सैय्यद आदी उपस्थित होते.

मराठी चित्रपट निर्मात्यांच्या पाठीशी सरकारचे पाठबळ उभे करु – नाना पटोले

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *