भारतीय हॉकी संघाच्या कर्णधारपदी वैष्णवी फाळकेची निवड

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२६ मे २०२२

पुणे


भारताच्या २३ वर्षाखालील महिलांचा हॉकी संघ आयर्लंडमध्ये पाच देशांच्या स्पर्धेत खेळणार आहे. पुण्याच्या क्रीडा प्रबोधनातून हॉकी खेळलेल्या वैष्णवी फाळकेची भारतीय हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

दीर्घ काळानंतर महाराष्ट्रातील खेळाडूला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्र हॉकी संघांतनेचे मनोज भोर बोलताना म्हणाले महाराष्ट्रातील एखाद्या महिला खेळाडूने भारतीय महिला संघाचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि त्याचा मान वैष्णवीला मिळाला याचा अभिमान आहे.

आयर्लंडमधील स्पर्धेची जबाबदारी वैष्णवीवर

वैष्णवी ही मूळची साताऱ्याची आहे. तिच्याबरोबरच अश्विनी कोळेकर, ऋतुजा पिसाळ या महाराष्ट्रातील हॉकी खेळाडूंचा भारतीय संघात समावेश आहे. त्याचबरोबर काजल आटपाडकर या खेळाडूचा राखीव म्हणून या संघात समावेश आहे.

भारतीय संघ या स्पर्धेत यजमान आयर्लंड बरोबर १९ जून, नेदरलँड बरोबर २० जून, युक्रेन २२ जून, आणि अमेरीकेबरोबर २३ जूनला भिडणार आहे. या स्पर्धेतील अव्वल दोन संघात २६ जूनला अंतिम फेरीची लढत होईल. त्याच दिवशी ब्रॉंझपदकासाठीही लढत होणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *