राजकीय विरोधक माजी आमदार विलास लांडे यांच्या राजमाता जिजाऊ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत मतदान केंद्रावर जाऊन केले मतदान…
रोहीत खर्गे, विभागीय संपादक, दि.1/12/2020
पिंपरी दि १ पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीत कोण बाजी मारणार हे सांगणे कठीण असून पदवीधर मतदार संघात 62 उमेदवार नशीब आजमावताना पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील आमदार आणि खासदारांमध्ये एकमेव पदवीधर मतदार असलेले आमदार महेश लांडगे यांनी मंगळवारी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी मतदार यादीत नाव नोंदवले असतानाही त्यांचे नाव मतदार यादीत न आल्याने नाराजी वेक्त केली.
विशेष म्हणजे, आमदार लांडगे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि माजी आमदार विलास लांडे यांच्याशी संबंधित असलेल्या लांडेवाडी येथील राजमाता जिजाऊ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर आमदार लांडगे यांनी मतदानाचा हक्क बाजावत ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’चाही संदेश दिला आहे. त्याचप्रमाणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संग्रामसिंग देशमुख यांनी कडेगाव येथे जिल्हा परिषद शाळा क्रमांक 4 येथे आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर वसंत सुवे यांच्या घरी गेले असता तेथे ही पोलिटिक्स विथ रिस्पेक्ट पाहायला मिळाला तेथे सांगलीतील दोन नेते संग्रामसिंग देशमुख व कृषी मंत्री विश्वजित कदम समोरासमोर आले तेव्हा ते एकमेकांशी बोलले विश्वजित कदम यांनी संग्रामसिंग देशमुख यांना शुभेच्छा दिल्या .आणि पुढे निघून गेले.
आज सकाळी या निवडणुकीसाठी शांततेत मतदानाला सुरूवात झाली. 12 वाजेपर्यंत १९.४४% मतदारांनी हक्क बजावला होता. यावेळी शहरातील युवकांनी बाहेर पडून सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला. पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण १८ ठिकाणी मतदान केंद्र आहेत. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरू असणार आहे.