रोहित खर्गे
विभागीय संपादक
दापोडी दि ३० मार्च २०२१
पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी भागात काही दिवसांपासून मोकाट व जखमी कुत्र्यांचा मुक्त संचार वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत.ठीक ठिकाणी भटकी कुत्री धुमाकुळ घालत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार होत आहे.
या पार्श्वभूमीवर दापोडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते रवी भाऊ कांबळे, आणि अक्षय गायकवाड यांनी या कुत्र्यांचा पूर्णपणे बंदोबस्त करण्याची मागणी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे प्रसिद्धी पत्रकात तिन्ही म्हंटले आहे कि भाजी मंडई व राहत्या वस्त्यांमध्ये ह्या भटक्या कुत्रांचा वावर जास्त प्रमाणात दिसून येत आहे. तसेच एकमेकांवर जोरजोरात भुंकने, हल्ला करणे काही कुत्र्यांना खरूज व खोलवर प्रमाणत जखमा झालेल्या दिसत आहेत, त्यामुळे लोकांमध्ये एक भीतीचे वातावरण तयार झाले आहे.व नागरिकांना त्याचा त्रास व धोका जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे.गेल्या काही दिवसात अनेकांना बाधित कुत्र्यानी दंश केल्याच्या घटना मध्ये वाढ होत चाली आहे.रात्री कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जाऊन कित्येक दुचाकी वाहनांच्या अपघातात वाढ होत चाली आहे.तसेच अधिक उपाय योजना म्हणून प्रशासनाने सफाई कर्मचारी असलेलं पथक तयार करून वेळेत लक्ष दयावे.व शहरातील मोकाट कुत्रे पकडण्याबाबत निविदा काढावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवी भाऊ कांबळे, आणि अक्षय गायकवाड यांनी केली आहे