नाशिकमध्ये मनसेला खिंडार,अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना पक्षात फूट

२८ डिसेंबर २०२२

नाशिक


राज्यात शिंदे सरकार आल्यापासून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांचा ओढा वाढला आहे. त्यातही ठाकरे गटातून फुटून येणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर राष्ट्रवादीतूनही अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले आहेत. मात्र, आता यात मनसेचाही नंबर लागला आहे.

ठाकरे गटा पाठोपाठ मनसेचे पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. विशेष म्हणजे मनसे नेते अमित ठाकरेंचा नाशिक दौऱ्या सुरू असतानाच मनसेत पडझड झाली आहे. पक्षाचा बडा नेता जिल्ह्यात असतानाही कार्यकर्ते पक्ष सोडत आहेत. अमित ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यातच मनसेचा एक माजी नगरसेवक आणि दोन पदाधिकारी आपल्या समर्थकांसह शिंदे गटात सामील झाले आहेत. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षातून पदाधिकारी जात असल्याने मनसेला मोठाच हादरा बसला आहे. त्यामुळे अमित ठाकरे आता नाशिकच्या संघटन बांधणीबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *