महाविकास आघाडीच्या चुका भोवणार;फायदा भाजपला होणार ?

प्रतिनिधी,राजू थोरात,तासगांव

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणुक महाविकास आघाडी प्रथमच लढवत आहे. एकीकडे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी तर दुस-या बाजूला केंद्रातील सत्ताधारी भाजप असल्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांसाठी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची समजली जात आहे.महाविकास आघाडीत एक संघ नाही.ताळमेंळ नसल्यामुळे भाजपला पुरेपुर फायदा होणार आहे.
पुणे पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी मतदान आज मंगळवारी (दि. 1 डिसेंबर) होणार आहे. तर गुरुवारी (दि. 3 डिसेंबर) मतमोजणी होणार आहे. पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे माजी आमदार शरद पाटील, मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे हे उमेदवार रिंगणात आहेत.


शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत, भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार, काँगेसचे उमेदवार जयंत आसगावकर, मनसेचे विद्यानंद मानकर, अपक्ष उमेदवार संतोष फाजगे हे उमेदवार पुणे शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी इच्छुक आहेत. या पाच प्रमुख उमेदवारांमध्ये पुणे शिक्षक मतदार संघाची लढत होणार आहे.
शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांच्या नंतर काही महिन्यातच राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात चार लाख 26 हजार 257 एवढे मतदार आहेत. तर पुणे शिक्षक मतदार संघात 72 हजार 545 मतदार आहेत.महाविकास आघाडी मध्ये एकमेकाची उणी धुणी काढण्यातच प्रचार झाला. नेत्याच्यातच ताळमेंळ नसल्याने भाजपला पुरेपुर फायदा होणार आहे.

मागील पंचवार्षिक पदवीधर मतदारसंघात चंद्रकांत पाटील,(भाजप) सारंग पाटील( राष्ट्रवादी) व अपक्ष उमेदवार अरुण लाड यांच्यामध्ये निवडणुकीचा सामना रंगला होता. त्यामध्ये चंद्रकांत पाटील यांना 60 हजार मते मिळाली तर सारंग पाटील यांना 58 हजार मते मिळाली तंर अपक्ष उमेदवार अरुण लाड़ यांना 35 हजार मते मिळाली. अरुण लाड यांनी बंडखोरी केल्यामुळे सारंग पाटील यांचा दोन हजार मतात फक्त पराभव झाला.
पण तेच सारंग पाटील आता अरुण लाड़ यांना मदत करणार नाहीत.त्यामुळे भाजपला फायदा होउ शकतो.

राज्यमंत्री विश्वजित कदम यांना गेल्या दोन निवडनुकित संग्रामसिंह देशमुख यांनी मदत केली होती.गेल्या विधानसभेला देशमुख यांनी स्वता अर्ज मागें काढून घेतला व राज्यमंत्री विश्वजित कदम यांना मदत केली.आता विश्वजित कदम यांचे कार्यकर्ते उघड़ बोलून दाखवत आहेत की आमचे नेते मंत्री विश्वजित कदम देशमुखांचां पैरा फेडणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *