आपला आवाज कला गौरव पुरस्कार 2020 ने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सन्मानित

पिंपरी-चिंचवड
दि.28/11/2020

  आपला आवाज आपली सखी सभासद आयकार्ड सभासद गीफ्ट चे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे व  स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिका फेम प्राजक्ता गायकवाड यांच्या हास्ते संपन्न झाले यावेळी महापौर उषा माई ढोरे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज मालीका फेम प्राजक्ता गायकवाड यांना आपला आवाज कला गौरव पुरस्कार 2020 चे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

     यावेळी आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुल परदेशी आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगीता तरडे विभागीय संपादक रोहीत खर्गे सुनीती ज्वेलर्सचे संचालक लखीचंद कटारिया, स्वर्णिम  ज्वेलर्सच्या संचालिका अक्षता मोहिते कलामंदिर ट्रॉफीच्या संचालिका शिल्पा शिंदे  उप पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

छत्रपती संभाजी मालिकेतील महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ता गायकवाड यांचं काम उल्लेखनीय असून त्यांनी अमर असं काम या छत्रपती संभाजी मालिकेमध्ये केले आहे. यामुळे आपला आवाज कला गौरव २०२० हा पुरस्कार त्यांना माझ्या हातून देताना मला निश्चितच अभिमान आणि आनंद होत आहे. अशा भावना पिंपरीचिंचवड च्या महापौर उषा माई ढोरे यांनी व्यक्त केल्या