शेकडो मतदान कार्ड चिखलीतील शरदनगरच्या के.जी.चावला शाळेत गेल्या २ वर्षांपासून धूळखात पडून

२१ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


मतदारांना वितरित करण्यासाठी आलेली शेकडो मतदान कार्ड चिखलीतील शरदनगरच्या के . जी . चावला शाळेत गेल्या २ वर्षांपासून धूळखात पडून असल्याचे उघडकीस आले आहे . शहरातील मतदारांना वितरित करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी निवडणूक विभागाकडून मतदान कार्ड पाठवण्यात आली होती . परंतु ही कार्ड आल्याची कल्पना बीएलओ असलेल्या शिक्षकांनी नागरीकांना दिलीच नाही . त्यामुळे मतदारांपर्यंत कार्ड आल्याची माहितीच नागरिकांपर्यंत पोचली नसल्याचे समजते . पूर्वी बीएलओ ( बूथ लेवल अधिकारी ) शिक्षक नागरीकांना घरपोच कार्ड देत . पण आता घरोघरी कोणीच फिरकले नसल्याने कार्ड वितरित झाले नाही त्यामुळे के .जी. कार्ड शाळेत तशीच पडून राहिली आहेत.

मतदान कार्ड शाळेतून मिळत नसल्याने त्यातील काही कुजली आहेत . काही रंगहीन झाले आहेत . शाळेत कार्डाची पोती भरून ठेवली आहेत आता ती वितरित केली नाही तर कचराकुंडीत फेकण्याच्या मार्गावर गेली आहेत . त्यामध्ये सर्वाधिक घरकुल , शरद नगर , नेवाळवेस्ती या भागातील नागरिकांचे कार्ड आहेत . ज्यांना कार्डाबद्दल माहिती आहे , अशांना बीएलओकडून यादी तयार करण्याच्या सूचना केल्या जात आहेत . वास्तविक पाहता शिक्षकांनी मतदारांना घरपोच मतदार कार्ड देणे आवश्यक आहे . याबाबत वारंवार नागरीकांनी विभागाकडेदेखील निवडणूक तसा पत्रव्यवहार केला होता . परंतु कोणीही त्याची दखल घेतली नाही . याबाबत स्थानिक नागरिक अशोक मगर म्हणाले , निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॅम्प लावून त्या- त्या परिसरातील नागरीकांना कार्ड वाटप केले पाहिजेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *