पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर पदासाठी भाजपकडून केशव घोळवे तर राष्ट्रवादी कडून निकिता कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल

बातमीदार: रोहित खर्गे, विभागीय संपादक

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका उपमहापौर पदासाठी आज भाजपाच्या वतीने नगरसेवक केशव घोळवे यांचा अर्ज दाखल करण्यात आला.

यावेळी, महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष अण्णा लोंढे, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी उपमहापौर तुषार हिंगे, क्रीडा सभापती उत्तम केंदळे, राजेंद्र गावडे, बाबू नायर, नगरसेविका अनुराधा गोरखे, प्रियंका बारसे, यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.


तर राष्ट्रवादी कडून निकिता कदम यांचा अर्ज सादर करण्यात आला त्यांच्या सोबत शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे , नगरसेवक प्रवीण भालेकर, राजू बनसोडे, माजी शिक्षण सभापती फझल शेख, व कार्यकर्ते उपस्थित होते.

६ नोव्हेम्बर ला होणाऱ्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपाचे संख्याबळ पाहता केशव घोळवे यांचा विजय निश्चित मानला जात असला तरी राष्ट्रवादी चे जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की आमच्यासोबत शिवसेना, मनसे सह भाजप चा नाराज गट आहे त्यामुळे चमत्कार घडू शकतो.