बातमीदार: रोहित खर्गे, पुणे विभागीय संपादक
पिंपरी दि १४ नोव्हेंम्बर, संस्कार प्रतिष्ठान चे नेहमीच विविध उपक्रम असतात. दरवर्षीप्रमाणे संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंंचवड शहराच्या वतीने यावर्षीची दिवाळी भोरगिरी ता खेड जि पुणे या परिसरातील डेहणे टोकावडे एकलहरे व भोरगिरी येथील कातकरी,कोळी,भिल्ल,ठाकर या आदिवासी जमातीतील ७५ कुटुंबांना रवा, मैदा, साखर, तेल, साबण, साडी,ड्रेस, ब्लँकेट व लहान मुलांना भिस्किट पुडे, चिवडा आणि सोनपाटडी यांचे वाटप केले.
यासाठी त्या परिसरातील संस्कार प्रतिष्ठानचे किरण विर्णक, अक्षय काथे, सुनिल कशाळे, मोहन भोकटे सर, शंकर खाडे, संदिप कशाळे यांनी सहकार्य केले.
संस्कार प्रतिष्ठानचे डॉ मोहन गायकवाड ,भरत शिंदे,रमेश सरदेसाई,रमेश भिसे,विजय आगम,दत्तात्रय देवकर,सुनंदा निक्रड,कविता वाल्हे,प्रेरणा शेळके,योगिता शेळके,नसिम शेख,मनिषा आगम यांनी सहभाग घेतला.