बातमीदार : रोहित खर्गे, विभागीय संपादक
उपनेते संपर्क प्रमुख मा.खासदार शिवाजी आढळराव पाटील , जिल्हा प्रमुख माऊली कटके , जिल्हा संघटिका सौ.सुलभाताई उबाळे, सहसंपर्क प्रमुख इरफानभाई सय्यद, विधानसभा प्रमुख श्री.धनंजयभाऊ आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकरणच्या महावितरण ऑफिसमध्ये रुपीनगर तळवडे सहयोगनगर त्रिवेणीनगर भागामध्ये विज बिलाबाबतीत तक्रारी येत असल्यामुळे महावितरणच्या उपविभाग प्राधिकरण येथे अधिकाऱ्यांना घेराव घालून संबंधित प्रश्न वीज बिल बाबत , नवीन मीटर उपलब्ध न होणे, वीज बिल वेळेवर न भेटणे त्या मुळे होणारे आर्थिक नुकसान सामान्य ग्राहकांना का ? मीटर रिडींग वेळेवर न घेणे , महावितरण च्या चुकी मूळे वीज बिल चुकीचे आले असल्यास ग्राहकांना आपल्या कर्मचारी मार्फत वीज बिल दुरुस्त घरपोच किंवा फोन वरती करून घ्यावे, तसेच सामान्य ग्राहकांना होणार त्रास कमी लवकरात लवकर करावा ह्या संदर्भात वारंवार निवेदन दिले असून दिवाळी च्या आत निवारण करावे असे निवेदन अति.कार्यकारी अभियंता चौधरी साहेब यांना देण्यात आला.
अन्यथा टाळे बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना शाखा रुपीनगर सहयोगनगर त्रिवेणीनगर च्या वतीने देण्यात आला ह्या वेळेस श्री.संतोष सौन्दणकर सदस्य पुणे जिल्हा सनियंत्रण समिती, विभागप्रमुख श्री नितीन बोंडे, विभाग संघटिका आशाताई भालेकर, अमित शिंदे युवासेना विधानसभा चिटणीस, सुनील समगीर विधानसभा उपाधिकारी, प्रवीण पाटील शाखा प्रमुख, रमेश पाटोळे, दयानंद भालेकर तसेच पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते .