वारूळवाडी येथून २२ वर्षीय विवाहिता दहा दिवसांपासून बेपत्ता

नारायणगाव (विशेष प्रतिनिधी)
नारायणगाव जवळील वारूळवाडी (तालुका जुन्नर) येथून २२ वर्षीय विवाहिता गेली दहा दिवसांपासून बेपत्ता झाली आहे.
या बाबतची फिर्याद विवाहित महिलेचे पती अक्षय सुधीर बनकर यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली. याबाबत सविस्तर माहिती अशी की २२ वर्षीय विवाहिता अन्नपूर्णा अक्षय बनकर लग्नापूर्वीचे नाव अन्नपूर्णा पांडुरंग कसाबे ही दिनांक २३ ऑक्टोबर २०२० रोजी नारायणगाव महाविद्यालयात आपला तृतीय वर्षाचा शेवटचा पेपर देण्यासाठी गेली होती. तेव्हापासून ती बेपत्ता झाली आहे. गेली दहा दिवस नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती आढळून आली नाही. दहा दिवसांपासून घरी परत न आल्यामुळे पालकांनी व तिच्या नातेवाईकांनी चिंता व्यक्त केली आहे.

अन्नपूर्णा हिने पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला असून, तिचा सडपातळ बांधा, उंची पाच फुट दोन इंच, रंग गोरा आहे. असे तिचे वर्णन असून अशा वर्णनाची विवाहिता कोणाला आढळल्यास त्यांनी ७९७२८८२७२४, ९६६५२२१५६९, ९३२५३७८४१६ व ८६००९९०५३६ या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन नारायणगाव पोलिसांनी केले आहे.

दरम्यान गेली काही महिन्यांपासून नारायणगावातील काही मुली घरातून निघून गेल्या असून त्यापैकी काहींनी प्रेम विवाह केला तर अद्यापही काही मुली बेपत्ता आहेत.

मुली बेपत्ता होण्याबाबत पालकांनी व नातेवाईकांनी आपल्या मुलींशी सुसंवाद राखणे गरजेचे असून या मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करणे आवश्यक आहे. असे आवाहन नारायणगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *