काही लोकांना माझ्या शरीराबद्दल आकर्षण असून ते त्यांच्या भाषणातही माझ्या शरीराचा उल्लेख करतात – देंवेंद्र फडणवीस
३० डिसेंबर २०२२
नागपूर
राज्यपाल भगरसिंग कोश्यारींसह भाजपा नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांविरोधात महाविकास आघाडीकडून काही दिवसांपूर्वी महामोर्चा काढण्यात आला होता. यावर टीका करताना देवेंद्र फडणवीसांनी हा मोर्चा नॅनो असल्याचे म्हटले होते. तर हा आमचा हा मोर्चा नॅनो नसून फडणवीसांच्या साईजचा होता, असं प्रत्युत्तर उद्वव ठाकरेंनी दिलं होते. उद्धव ठाकरेंच्या या विधानावरून देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.
नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात काल अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू असताना देंवेंद्र फडणवीस विरोधकांच्या प्रश्नांवर उत्तरं देत होते. त्यांच्या बाजुला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बसले होते. यावेळी सभागृहातील सदस्यांनी मुख्यमंत्री सभागृहाबाहेर गेले का? असं विचारातच ते माझ्या बाजुला आहेत. मात्र, माझ्या शरीरामुळे ते दिसत नाहीत, असं उत्तर फडणवीसांनी दिलं. तसेच काही लोकांना माझ्या शरीराबद्दल आकर्षण असून ते त्यांच्या भाषणातही माझ्या शरीराचा उल्लेख करतात, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.