मुथाळणे- आदिवासी डोंगराळ भागामध्ये कोणत्याही प्रकारच्या मोबाईलला रेंज नाही, कोणत्याही विद्यार्थ्यांच्या घरी दूरदर्शन नाही त्यामुळे या ठिकाणचे सर्वच विद्यार्थी चालू घडामोडी, बातम्या यांपासून वंचित रहात होते. येथील विद्यार्थ्यांना जगामध्ये काय चाललं आहे हे समजण्यासाठी या संस्थेने येथील गरज ओळखून या आदिवासी शाळेस न्यूजपेपर वाचनालय भेट दिले. त्याबद्दल Helping Hands Group Bajaj Auto या ग्रुपचे ग्रामस्थ व शिक्षक व पालकांनी खूप खूप आभार मानले व त्यांना धन्यवादही दिले
*Helping Hands Group Bajaj Auto तर्फे देण्यात आलेले न्यूजपेपर वाचनालयाचे उदघाटन ह. भ. प. मूठे महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक सौ. सुशीला डुंबरे मॅडम, सौ. कमल डुंबरे मॅडम, सौ. शुभांगी कसार मॅडम, श्री. जोशी सर त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, गावच्या सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तसेच ग्रामस्थ पालकवर्ग उपस्थित होते. या कामी विशेष सहकार्य आदरणीय संजय डुंबरे सर यांचे लाभले आहे,असे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुशीला डुंबरे यांनी आपला आवाज शी बोलताना सांगितले.