धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार बोनस – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

३० डिसेंबर २०२२

नागपूर


अतिवृष्टीमुळे  हवालदिल झालेला आणि गेल्या दोन वर्षांपासून बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या धान उत्पादकांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या विदर्भ आणि मराठवाडय़ातील प्रश्नावरील चर्चेला विधानसभेत उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विदर्भासाठी पर्यटन सर्किट, नवीन खनिज धोरण, समतोल प्रादेशिक विकासासाठी नवीन समिती, अशा विविध घोषणा केल्या. शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम बोनस म्हणून देण्यात येईल. याचा लाभ धान उत्पादक जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांना होणार आहे. हा बोनस थेट शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होईल. धान खरेदीत कोणतीही अनियमितता झाल्याची तक्रार आलेली नाही. केंद्र शासनाने राज्याला १५ लाख मेट्रीक टन धान खरेदीस मंजुरी दिली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *