मंचर पोलिस पथकाची दबंग कामगिरी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना चाळीसगाव येथुन अटक..

मंचर : – ब्युरोचिफ मोसीन काठेवाडी
श्री नवनाथ कोंडीभाऊ शिंदे रा. साकोरे ता.आंबेगाव जि. पुणे यांनी व इतर ७ ते ८ शेतकरी यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ऊस गाळप हंगाम करीता वेगवेगळे ऊसतोड मुकादम यांना एकूण ७१,१२, ९०० रुपये घेऊन काराराप्रमाणे कोयते व ऊसतोड कामगार न पुरविता आर्थिक फसवणूक केली म्हणून मंचर पोलिस स्टेशन येथे गु र नं १४/२१ भा. द. वि कलम ४२०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर मुकादम यांनी अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुधाकर कोरे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, पोलिस नाईक खैरे, मडके, पोलिस शिपाई वाघ, रोडे असे पथक चाळीसगाव जि. जळगाव येथे रवाना होऊन 1) श्रावण जगन राठोड 2) नितीन पंडित पाटील 3) अनिल पंडित जाधव सर्व राहणार चाळीसगाव जि. जळगाव यांना अटक करून त्यांची दि १० फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आल्याची माहिती मंचर पोलिस स्टेशनचे जेष्ठ पोलिस निरिक्षक सुधाकर कोरे यांनी दिली.
अटक आरोपींनी परिसरातील अनेक शेतकऱ्यांची अशाच प्रकारे फसवणूक केली असण्याची शक्यता असल्याने ज्यांना याबाबत तक्रार करावयाची आहे त्यांनी मंचर पोलीस स्टेशन येथे तक्रार द्यावी असे आवाहन मंचर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री.सुधाकर कोरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *