अजित पवारांना वाटत आपण पहाटे शपथ घेऊन सरकार स्थापन करू; शहाजी बापू पाटील यांची टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०४ ऑक्टोबर २०२२


राज्य सरकारच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणाच्या दबावाला बळी पडून चुकीची कामे करु नये. दिवस बदलतात, त्यामुळे येत्या काळात आम्ही कधी सत्तेत येऊ हे कोणाला कळणार देखील नाही, अशा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिला होता. त्यावरून शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.

सरकारी अधिकाऱ्यांवर पवार कुटुंबाचे दबावतंत्र – शहाजी पाटील

सरकारी अधिकाऱ्यांवर पवार कुटुंबाचे दबावतंत्र पहिल्यापासून आहे. यामध्ये काय नवीन नाही. पण, कोणताही अधिकारी या दबावाला बळी पडणार नाही. अजित पवारांना वाटत आपण पहाटे शपथ घेऊन सरकार स्थापन करू  मात्र, अजित पवारांनी पंधरा वर्षे निवांत रहायचं आहे, असा टोला शहाजी बापू पाटील यांनी लगावला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *