वल्लभनगर आगारामार्फत अष्टविनायक दर्शन बस

०५ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


संकष्ट चतुर्थीनिमित्त अष्टविनायक दर्शनासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना वल्लभनगर आगारामार्फत शनिवारी ( दि . १२ ) दोन दिवस बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे . आगाराच्या संकेतस्थळावर आरक्षणाची सुविधा आहे . राहण्याचा जेवणाचा खर्च नागरिकांनी स्वतः करायचा आहे . या सुविधेचा फायदा घेण्याचे आगारामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

संकष्ट चतुर्थीनिमित्त अष्टविनायक दर्शनासाठी दरवर्षी गणेशभक्त जात असतात . शहरातील गणेशभक्तांची अल्पदरात सोय व्हावी , या उद्देशाने वल्लभनगर आगाराकडून बसची सुविधा देण्यात आली आहे . महामंडळाच्या www .mrrtb.go © t.in या संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे . १२ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता बस आगारातून दर्शनासाठी रवाना होणार आहे . ओझर येथे भक्तनिवास येथे राहण्याची व जेवण्याची सोय असून , हा खर्च नागरिकांनी स्वतः करायचा असल्याचे आगाराकडून सांगण्यात आले आहे . दोन दिवस दर्शनाची सुविधा देण्यात आली असून , या सेवेचा लाभ घ्यावा , असे आवाहन पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *