सभेसाठी परवानगी नाकारणे हा केविलवाणा प्रकार होता – सुषमा अंधारे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०५ नोव्हेंबर २०२२


ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने राज्यभर दौरा करत आहेत. जळगावमधील त्यांच्या सभेला परवानगी नाकारतानाच त्यांना हॉटेलमध्येच नजरकैदेत ठेवल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, काल माझी सभा नाकारण्याचं कारण मला शेवटपर्यंत कळलं नाही. कारण माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही किंवा कुणाचा तक्रार अर्जही आलेला नव्हता. फक्त मला नजरकैदेत ठेवण्याचा प्रकार झाला. सभेची वेळ संपेपर्यंत मी हॉटेलमधून बाहेर पडणार नाही याची काळजी घेण्यात आली. मी कदाचित जोरजबरदस्ती करून बाहेर पडण्याचाही प्रयत्न करू शकले असते. पण त्यामुळे भाजपाला किंवा गुलाबराव पाटलांना जे अपेक्षित होतं की यातून गोंधळ व्हावा, ते मला टाळायचं होतं. मला त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकायचं नव्हतं. आपण कायद्याचा आदर करणारे लोक आहोत. हा सगळा प्रयत्न केविलवाणा होता. कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबतो ही खुळी कल्पना आहे. तुम्ही अशा प्रकारे आवाज दाबून ठेवू शकत नाही, असंही त्या म्हणाल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *