नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर शालिमार-हावडा एक्स्प्रेसच्या इंजिनला आग
आपला आवाज न्यूज नेटवर्क
०५ नोव्हेंबर २०२२
नाशिकरोड रेल्वे स्थानकात शालिमार एक्सप्रेस पोहचताच पार्सल वाहून नेणाऱ्या गाडीला आग लागली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. आग लागल्याचे माहिती मिळताच लगेचच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तर स्थानिक रेल्वे स्थानकावरील बंबाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
आग कशी लागली, याबाबत अद्याप स्पष्ट झाले नसून आग विझवण्याचे काम सुरु आहे. ट्रेन क्रमांक 18030 शालीमार ते एलटीटी ही मुंबईकडे जात असताना नाशिकरोड रेल्वे स्थानकावर थांबली असताना अचानक पार्सल व्हॅनमध्ये आग लागल्याचे निदर्शनास आले. ही बाब रेल्वे प्रशासनास लक्षात येताच आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. सद्यस्थितीत आग नियंत्रणात आहे. कोणत्याही प्रवाशाला/कोणत्याही व्यक्तीला कोणतीही दुखापत नसल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.