आंबेगाव तालुक्यातील माळीण हे एक पुनर्वसनाचे आदर्शवत मॉडेल आपल्याला पहावयास मिळते:पूर्वाताई वळसे पाटील

आंबेगाव : –
आंबेगाव .ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
       महाराष्ट्रात या वर्षी अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे  पुराचेपाणी गावत व शहरात शिरल्याने थरकाप उडविणारा प्रसंग व तळीयेत दरडकोसळन्याच्या घटनेने पुन्हां एकदा माळीण सात वर्षापूर्वी दूर्घटना आठवून अंगावर शहारे उठणारी दुर्ष्य डोळयासमोरुन सर्वत्र चिखल व पाऊसाचा हौदोस भित्तीने थरकाप उडविणारा अँबुलन्सचा आवाज दु:खाने व्याकूळ झालेल्या नातेवाईकाचा गगनाला भिडणारा हंबरडा याघटनेवर मात करुन पुन्हा माळीणने घेतलेली उभारी
आज माळीण दुर्घटना, सातवा स्मृतीदिन!  ३० जुलै २०१४ रोजी माळीण, ता.आंबेगाव या गावातील निसर्गप्रकोपात १५१ निष्पाप नागरिकांचा बळी गेला. कोणतीही दुर्घटना ही वाईटच असते. मात्र दुर्घटनेनंतर शासन, प्रशासन आणि समाज एकत्र येतो, त्यावेळी दुख:ची तीव्रता कमी होते. माळीणच्या बाबतीत हेच घडले आहे. माळीणचे पुनर्वसन करताना मा.ना.दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी प्रशासनासोबत संवेदनशीलतेने काम करत नवीन पुनर्वसित माळीण गाव उभे राहिले. शासनाच्या सोबत समाजातील अनेक घटक एकत्र आल्यामुळे माळीणच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुकर झाली.

मा.दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनानेही माळीणचे पुनर्वसन करताना जनसंवादावर भर दिला, त्यामुळे येथील नागरिकांना अपेक्षीत असणारे पुनर्वसन झाले आहे. कोणत्याही प्रकारच्या पुनर्वसनाची प्रक्रिया ही बाधितांसाठी क्लेशकारकच असते. जुन्या जागेत, गावात बाधितांच्या अनेक आठवणी जोडलेल्या असतात. त्यामुळे पुनर्वसन करताना बाधितांच्या पाठिशी उभे राहण्याची, त्यांना धीर देण्याची आवश्यकता असते . यासाठी प्रशासन आणि जनतेची जोड मिळणे आवश्यक असते . लोकशाहीत संवेदनशीलता महत्वाची असते. लोकप्रतिनिधींबरोबरच प्रशासनानेही संवेदनशीलता जपली व माळीण आणि परिसरातील विविध कामे मार्गी लागलीत. आज माळीण हे एक पुनर्वसनाचे आदर्शवत मॉडेल आपल्याला पहावयास मिळते. आज त्या प्रकोपाच्या वेदना ताज्या असताना पुन्हा एकदा माळीण नव्या जोमाने उभारी घेत आहे. ३० जुलै २०१४ रोजी माळीण गावातील निसर्गप्रकोपात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना पूर्वाताई दिलीपराव वळसे पाटील  यांनी भावपूर्ण श्रद्धांजली! आर्पण केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *