राम ग्रामीण पतसंस्थेच्या वतीने घोडेगाव व परिसरातील सुमारे १५० गरीब-गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
०७ जुलै २०२२
घोडेगाव
घोडेगाव परिसरात नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या स्व.राम काळे मिञ मंडळ व राम ग्रामीण पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने घोडेगाव व परिसरातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके तसेच शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम जनता विद्या मंदिर येथील सभागृहात पार पडला सुमारे १५० गरजु विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा घेतला.
या सामाजिक उपक्रमाची संकल्पना ज्यांची होती ते भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक अक्षय काळे म्हणाले की, स्व.राम काळे मिञ मंडळ व सर्व सदस्यांच्या सहकार्यातुन यापुढील काळात असेच उपक्रम सुरु राहतील. या प्रसंगी घोडेगावच्या सरपंच क्रांती गाढवे, उपसरपंच सोमनाथ काळे, आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे संचालक बाळासाहेब काळे, राजेश काळे, नर्मदे हर ग्रुपचे अध्यक्ष विनोद काळे सर ,मोहन काळे, अनुसया महिला पतसंस्थेच्या ज्योती घोडेकर,शोभाताई सोमवंशी, महेश बोऱ्हाडे, विजय मेहेर, वैभव मंडलिक, सिताराम काळे, मोसिन काठेवाडी, शनि कर्पे ,मुख्याध्यापक संजय जाधव, अनिल काळे तसेच ज्युनिअर कॉलेज,माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते.