मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात पदभार स्विकारला

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०७ जुलै २०२२

मुंबई


गेल्या काही दिवसांपासून राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप झाला. आणि हा भूकंप घडवणारे राजकारणातील चाणक्य समजले जाणारे देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास सरकार पाडले. हे सगळं घडवून आणण्यात अदृश्य शक्तींचा वापर करण्यात आला असे राजकीय जाणकार सांगतात. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सर्व नाराज आमदारांची मोठी मोट बांधली आणि एकामागून एक सेनेचे आमदार बाहेर पडून शिंदे गटाला सामील झाले आणि सरकार पाडले हे सगळ्या देशाने पाहिले.

या सगळ्या घडामोडीत मोलाची भूमिका बजावणारे देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असे खुद्द एकनाथ शिंदेनाही वाटत होते पण येथेही मोठे ट्विस्ट आले. केंद्रातून आदेश आले आणि देवेंद्र यांनाही धक्का बसला असेल कारण केंद्रीय नेत्यांच्या आदेशानुसार महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार हे आदेश आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा अजून एक धक्का बसला. आणि या मंत्रिमंडळात सामील न होता बाहेर राहण्याचा पावित्रा देवेंद्र यांनी घेतला होता पण भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री होण्याचे आदेश दिले.

आज दुपारी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले आणि आपल्या कामकाजाला सुरवातही केली. लवकरच उर्वरित खातेवाटपही होणार असल्याचे सांगितले. भाजपला २५ पर्यंत तर मुख्यमंत्री शिंदे गटाला १३ ते १४ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. पुणे जिल्ह्यात कोणाची वर्णी लागते याकडे जिल्ह्यात सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातही पिंपरी चिंचवड मध्येही राज्यमंत्री पदाची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे ही संधी शहराध्यक्ष महेश लांडगे यांना मिळाली तर शहराला प्रथम मंत्री होण्याचा मान त्यांना मिळेल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *