पुणे ग्रामीण डाक विभागातर्फे जिल्ह्यात नवीन आधार कार्ड व आधार अपडेट करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. १२/०४/२०२४.
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी किंवा नवीन आधार कार्ड तयार करण्यासाठी आता तुम्हाला ई-सेवा केंद्र (e-Seva Kendra) वा आधार कार्ड केंद्रावर जाण्याची गरज नाही. आधार कार्डशी संबंधित सर्व कामे नागरिकांना आता पोस्ट ऑफिसच्या शिबिरामार्फत पूर्ण करता येतील. टपाल खात्याने या सेवा प्रत्येक गावा गावात देण्याची जबाबदारी खाद्यांवर घेतली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) याविषयीचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी टपाल खात्याची मदत घेण्यात येत आहे. टपाल खात्याच्या सहकार्याने ही सेवा देशभरात पोहचवली जात आहे. या सुविधेमुळे नागरिकांना होणारा त्रास तर कमी होईलच, पण चुका होण्याचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल.


त्या अनुषंगाने, पुणे ग्रामीण डाक विभागाच्या कार्यक्षेत्रातील भोर, वेल्हे, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, हवेली व शिरूर तालुक्यातील पोस्ट ऑफिस मार्फत ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, शाळा, गृहनिर्माण सोसायट्या इत्यादी ठिकाणी दिनांक ०५.०४.२०२४ ते ०२.०५.२०२४ या कालावधीत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरात आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक करणे. नावात बदल करणे, घरचा पत्ता अपडेट करणे, जन्मतारीख अपडेट करणे, तसेच लहान मुलांचे आधार कार्ड तयार करणे इत्यादी सुविधा पुरविण्यात येतील, त्याचबरोबर पोस्ट ऑफिसच्या इतर सेवा व योजनांची माहिती देण्यात येणार असल्याची माहिती, बाळकृष्ण एरंडे (अधीक्षक डाकघर पुणे ग्रामीण डाकविभाग) यांनी दिलीय. तसेच याबाबत जिल्ह्यातील गैरसरकारी संस्था (NGO), ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, शाळा आणि गृहनिर्माण संस्थांना आवाहन केले आहे कि, “जे कुणी नागरिकांना एकत्र करू शकतात आणि विशेष शिबिर आयोजित करण्यासाठी इच्छुक आहेत, अशांनी अधीक्षक डाकघर पुणे ग्रामीण डाक विभाग, शिवाजीनगर पुणे ४११००५ यांचेशी खाली दिलेल्या इमेलद्वारे [email protected]
किंवा फोन द्वारे ०२०-२५५१०१२५ संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केलेले आहे.


या शिबिराचा फायदा जेष्ठ नागरिक, कामगार, महिला व विद्यार्थ्यांना होणार असून त्यांचा बहुमुल्य वेळ वाचणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *