राज्यस्तरीय मंथन स्पर्धेत घोडेगाव चा सत्यम वाघमारे राज्य गुणवत्ता यादीत

घोडेगाव:-
राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान परीक्षा दि.४/२/२०२४ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेत न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगाव विद्यालयातील इयत्ता सहावी मध्ये शिकणारा सत्यम मोहन वाघमारे हा विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चौथा आलेला आहे. त्याने या परीक्षेत ३०० पैकी एकूण २७२ गुण मिळवले. मंथन परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत झळकणारा विद्यालयाचा तो पहिलाच विद्यार्थी आहे.सत्यम वाघमारे हा विद्यालयातील अत्यंत हुशार व गुणी विद्यार्थी आहे. दरवर्षी तो विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होतो व उत्तुंग यश संपादन करतो. नुकत्याच झालेल्या नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेत देखील त्याने राज्य गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याच्या या यशस्वी वाटचालीमुळे विद्यालयामध्ये आनंदाचे वातावरण आहे. सत्यम हा अत्यंत अभ्यासू असून विविध स्पर्धा परीक्षा देण्यामध्ये त्याला रस आहे. त्याची आई सौ. अर्चना वाघमारे या स्वतः त्याला सतत मार्गदर्शन करत असतात. सर्व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन देखील त्याला लाभत असते. सत्यमच्या या ऐतिहासिक यशाबद्दल आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष श्री तुकाराम काळे, उपाध्यक्ष श्री शाम शेठ होनराव, कार्याध्यक्ष श्री राजेश काळे, संस्थेचे सेक्रेटरी श्री अक्षय काळे, विद्यालयाचे चेअरमन श्री बाळासाहेब काळे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक, सल्लागार तसेच विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती मेरीफ्लोरा डिसोझा,प्राचार्या श्रीमती रेखा आवारी, पर्यवेक्षिका सौ.वंदना वायकर सत्यमच्या वर्गशिक्षिका सौ. दीपा उजागरे , सर्व विषय शिक्षक विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघाचे सर्व सदस्य यांनी कौतुक करून त्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. तसेच त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अभ्यासातील सातत्य, अवांतर वाचन, एकाग्रता व ध्येय निश्चिती यामुळे आपण आपल्या जीवनात यश संपादन करू शकतो असा मग बहुमोल संदेश विद्यालयाचे चेअरमन श्री बाळासाहेब काळे यांनी यावेळी सर्व विद्यार्थ्यांना दिला. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *