नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी

३० नोव्हेंबर २०२२


आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज (बुधवार) मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना आज बेल मिळणार की पुन्हा त्यांची रवानगी जेलमध्ये होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. मलिक सध्या कुर्ला येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना, नवाब मलिक हे सरकारमधील मंत्री होते. त्यावेळी दाऊद इब्राहिमशी कनेक्शन असल्याच्या आरोपावरून ईडीने (ED) त्यांना 23 फेब्रुवारीला अटक केली होती. याशिवाय गोवावाला कंपाऊंडमधील जमीन खरेदीच्या व्यवहारात नवाब मलिक यांनी आर्थिक गैरव्यवहार केला, असा आरोपही ईडीकडून करण्यात आला. यापूर्वी नवाब मलिक यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला होता. त्यामुळे त्यांना दिलासा मिळणार की त्यांच्या अडचणी अजून वाढणार हे पाहावे लागणार आहे. सुमारे पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा मलिक यांच्या वकिलांकडून करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप याप्रकरणात दिलासा मिळाला नाही.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *