एसटीच्या पुणे विभागाच्या ताफ्यात 66 इलेक्ट्रिक एसटी बस दाखल होणार

१२ नोव्हेंबर २०२२

पुणे


जानेवारी महिन्यात एसटीच्या पुणे विभागाच्या ताफ्यात 66 नव्या इलेक्ट्रिक एसटी बस दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्याचे काम एसटीच्या पुणे विभागाकडून युध्दपातळीवर सुरू आहे. शासनाच्या फेम 2 या योजनेअंतर्गत एसटी महामंडळ 150 ई-एसटी ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यापैकी 66 ई-एसटी बस पुणे विभागाला देण्यात येणार आहेत. या इलेक्ट्रिक गाड्यांच्या माध्यमातून नगर, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नाशिक या ठिकाणी प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू असून, या गाड्या जानेवारी 2023 मध्ये पुण्यात येतील, असे एसटी प्रशासनाने सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *