मला संधी न देण्याचं उत्तर त्यांच्याकडे ज्यांनी संधी दिली नाही; पंकजा मुंडेंची घुसमट कधी थांबणार ?

दि.०९/०१/२०२३
मुंबई


मुंबई : पंकजा मुंडे भाजपत नाराज असल्याच्या चर्चा सतत रंगत असतात. पंकजा मुंडे अनेकदा आपली नाराजी अप्रत्यक्षरीत्या बोलूनही दाखवतात. बीडच्या राजकारणात पंकजा मुंडेंचं महत्त्वाचं स्थान आहे. मुंडे समर्थकांची संख्या ही तितकीच लक्षणीय आहे. मात्र असं असताना देखील भाजपकडून पंकजा यांना डावलण्यात येतं असं बोललं जातं.

दरम्यान यावर पंकजा मुंडे यांनी आता परखड भाष्य केल आहे.पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये तुम्हाला संधी का मिळत नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा “मला संधी का मिळत नाही, याचं उत्तर मला संधी देणाऱ्यांनी ती का दिली? अन् ज्यांनी संधी दिली नाही दिली त्यांनी का नाही दिली तेच देऊ शकतात. मी त्याचं उत्तर नाही देऊ शकत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

ज्या गोष्टी मनात बाळगून मी राजकारणात आले. त्या समाजासाठी काम करण्याची जर मला मुभा नसेल तर कॉम्प्रोमाइजचं राजकारण मला शक्य होणार नाही असही पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांची नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. राजकारणातील चिखलफेकीकडे लक्ष देऊ नका. मी नाराज नाही असं पंकजा मुंडे जरी बोलत असल्या तरी अंदर की बात कुछ औंर है ! आणि या गोष्टी जनतेला कळतात. त्यामुळं पंकजा मुंडे यांचं नाराजीनाट्य कधीपर्यंत चालणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *