सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक परशुराम लोखंडे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन उत्साहात

नारायणगाव :- (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
पारगाव (शिंगवे) येथील रहिवासी असलेले तसेच मुंबई क्राइम ब्रॅंचचे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी परशुराम बाबुराव लोखंडे यांच्या “प्रेमलीला भाग १ ते ३” तसेच “अनुबंध” या काव्यसंग्रहांचा प्रकाशन सोहळा कविवर्य अशोक बागवे यांचे शुभहस्ते नूकताच पार पडला.
यावेळी कवि सतिश सोळाळूंकर यांनी कवी परशुराम लोखंडे यांचे कौतुक केले, यावेळी एडव्होकेट आर. बी. मातकर यांच्या ” मातीतील हिरे तसेच सख्खी शेजारीण या पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले. शारदा प्रकाशनचे प्रकाशक संतोष राणे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन केले व उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक लोखंडे यांचे कुटुंबीय व मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *