नारायणगाव महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर

नारायणगाव :- (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)

केरळा लॉ कॉलेज तिरुअनंतपुरम, केरळ, सेंटर फॉर ॲडव्हान्स लीगल स्टडीज अँड रिसर्च, केरळ, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ केरळ आणि इनफिनेट ग्लोबल रिसर्च कॉन्फरन्स फोरम, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “ग्लोबल सिनर्जी-२०२४” या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत ग्रामोन्नती मंडळाचे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नारायणगाव मधील श्वेता वाघ, सिद्धी अर्विकर, जान्हवी मेहेर आणि शितल घंगाळे यांनी “इम्पॅक्ट ऑफ कॉमर्स एज्युकेशन ऑन इंटरप्रिनीयर आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी” या विषयावर संशोधन निबंध सादर केले.
या विद्यार्थिनींना प्रा. डॉ. जे. पी. भोसले, डॉ मधुरा काळभोर आणि डॉ. विनोद पाटे यांनी मार्गदर्शन केले. जगभरातून ८० प्राध्यापक आणि ११० विद्यार्थी परिषदेत सहभागी झाले होते. ३० प्राध्यापक तर ५० विद्यार्थ्यांनी त्यांचे शोधनिबंध सादर केले. नारायणगाव महाविद्यालयातील श्वेता वाघ, सिद्धी आर्विकर, जान्हवी मेहेर व शितल घंगाळे यांना “बेस्ट रिसर्च पेपर प्रेझेंटर” अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. अशी माहिती वाणिज्य संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. जे. पी. भोसले आणि प्राचार्य डॉ. ए. बी. कुलकर्णी यांनी दिली.
ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर, कार्यवाह रवींद्र पारगावकर, उपाध्यक्ष सुजित खैरे, उपकार्याध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी, सहकार्यवाह अरविंद मेहेर आणि इतर संचालकांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

या विद्यार्थिनींचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *