(बातमी प्रतिनिधी – रवींद्र खुडे, विभागीय संपादक, शिरूर.)
कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे, या वर्षीचा पुण्यतिथी सोहळा शिरूर मधील कुंभार समाजाने साधेपणाने व आपापल्या घरी गोरोबा काकांच्या प्रतिमेला अभिवादन करून साजरा केला.
शिरूर मधील कुंभार आळी येथे प्रत्येक समाजाच्या घरी जाऊन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना काही दिवस घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करत, लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा आपण जोमाने आपापल्या व्यवसायात चांगली झेप घेऊ असा आत्मविश्वास देण्यात आला. सध्याच्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी काय काळजी घेणे गरजेचे आहे, या
सूचना सर्व समाजबांधवांना देण्यात आल्या. अशी माहिती अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे तालुका अध्यक्ष योगेश जामदार यांनी दिली.
तसेच, सकाळी साध्या पद्धतीने संत गोरोबा काका मंदिरात, गोरोबाकाकांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. तसेच नंतर कुंभार आळीतील सर्व समाजबांधवांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
सदर कार्यक्रमांचे आयोजन शिरूर तालुका कुंभार समाज व कुंभार आळी मित्र मंडळ यांच्या वतीने, तसेच बाळासाहेब जामदार, शशिकांत शिर्के, विजय शिर्के, संभाजी जामदार, संतोष जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कामात शंकर जामदार, चैतन जामदार, शरद जामदार, तेजस जामदार आदींनी मोलाचे योगदान दिल्याचे, तालुकाध्यक्ष योगेश जामदार यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले.