मागील वर्षभरात 12 कोटी 23 लाख रुपयांची बेकायदा दारू जप्त

दि. ०६/०१/२०२३
पुणे


पुणे : अबकारी कर खात्याच्या पुणे कार्यालयाने अवैध दारू निर्मिती, विक्री, वाहतूक प्रकरणी मागील वर्षभरात 1 हजार 807 गुन्हे दाखल केले असून 2 हजार 6 आरोपींना अटक केली. तर, 200 पेक्षा अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत.

अबकारी कर खात्याचे पुणे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार या कालावधीत 12 कोटी 23 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आली आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी अबकारी कर विभागाने अधिक प्रमाणात कारवाई केली आहे. मागील वर्षी 1 हजार 538 खटले दाखल करण्यात आले होते. 7 कोटी 91 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

या वर्षी मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 5 कोटी रुपयांचा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अबकारी कर खात्याची मंगळवारपेठ पुणे, तळेगाव दाभाडे, ताडीवाला रोड, पिंपरी चिंचवड, नारायणगाव, सासवड येथे गोदामे आहेत.जप्त करण्यात आलेला मुद्देमाल तेथे ठेवण्यात येतो. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची विल्हेवाट लावली जाते, अशी माहिती अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *