नारायणगाव | श्री आनंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सचिन कांकरिया यांची निवड…

श्री आनंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सचिन कांकरिया यांची निवड .

उपाध्यक्षपदी धनेश शेलोत तर सचिव पदी निर्मल मुथ्था .

नारायणगाव, (किरण वाजगे, कार्यकारी संपादक) : नारायणगाव येथील श्री आनंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सचिन सुभाष कांकरिया , उपाध्यक्षपदी धनेश बाळासाहेब शेलोत तर सचिव पदी निर्मल सुभाष मुथ्था यांची निवड करण्यात आली , अशी माहिती पिठासीनधिकारी सुयोग अशोक गांधी यांनी दिली .

संस्थेचे संस्थापक अशोक बन्सीलाल गांधी यांच्या उपस्थितीत व सुयोग गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आले होती. या बैठकीत नव्याने स्थापन झालेल्या श्री आनंद पतसंस्थेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली . पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून संस्थापक सचिन सुभाष कांकरिया , उपाध्यक्षपदी धनेश बाळासाहेब शेलोत तर सचिव पदी निर्मल सुभाष मुथ्था यांची निवड करण्यात आली .

यावेळी संचालक रमेश सुभाष चोरडिया , स्वप्निल प्रवीण भन्साळी , महावीर अशोक खिवंसरा , संदेश सतीश कोठारी , सौ हेमा शशिकांत लोढा , सौ. भक्ती आनंद पोखरणा , सौ. दर्शना दत्तात्रय सरवदे – बोरा , विशाल विजयकुमार वरवंटे , सुरेश कृष्णजी गोसावी , कल्पेश जवाहर गुगळे , शुभम संजय मुनोत , व्यवस्थापक पूजा विठ्ठल पुंडे आदी उपस्थित होते .
यावेळी नवीन पदाधिकारी यांचा सन्मान संस्थेचे संस्थापक अशोक बन्सीलाल गांधी यांच्या यांच्या हस्ते करण्यात आला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *