बातमीदार : रोहित खर्गे, विभागीय संपादक
पिंपरी दि २८ ऑक्टोबर, लॉकडाऊनच्या काळात शाळांनी विद्यार्थी-पालकांकडून कोणत्याही प्रकारची फीची मागणी करू नये, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांंनी केल्या आहेत. खरे तर याबाबतचे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने ३० मार्च रोजी काढले आहे. मात्र तरीही काही शाळा फीवसुलीसाठी पालकांच्या मागे तगादा लावत असल्याने शिक्षणमंत्र्यांना सोशल मीडियाच्या माध्यमाने शाळांना ही तंबी द्यावी लागलेली आहे. याच विषयी महापौर माई ढोरे यांच्याकडे विचारणा केली असता अशा शाळांवर कारवाई करण्याचे आदेश मी आयुक्तांना देणार आहे व विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा कोणाला अधिकार नाही.
कोरोना काळात काही लोकांची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने फी भरू शकत नाहीत. अशा लोकांच्या मागे तगादा लावतात. फी नाही भरली तर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास बंद करतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. तरी शासनाचे व महानगरपालिकेचे नियम पाळून फी वसुलीसाठी सक्ती करू नये.
ज्या शाळा फी वसुलीसाठी सक्ती करतील अशा शाळांवर आयुक्तांनी कठोर कारवाई करावी असे आदेश मी आयुक्तांना पत्राद्वारे देणार असल्याचे महापौर माई ढोरे यांनी सांगितले.