गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर नारायणगाव पोलिसांची कारवाई, १६० लिटर गावठी दारू केली जप्त

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)

नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत हिवरे तर्फे नारायणगाव व धनगरवाडी या ठिकाणी गावठी दारू विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई करण्यात आली असून त्याच्याकडे सापडलेली १२ हजार ८००रुपये किमतीची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी मारूती साळवे (रा. हिवरे तर्फे नारायणगाव) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान हिवरे तर्फे नारायणगाव व धनगरवाडी येथे गावठी दारू विकली जात असल्याची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनला मिळाल्याने सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे, विनोद धूर्वे , पोलीस हवालदार संतोष कोकणे, पोलीस नाईक मंगेश लोखंडे, पोलीस नाईक दत्ता तळपाडे , पोलीस नाईक आदिनाथ लोखंडे, पोलीस शिपाई गोरक्ष हासे , सत्यम केळकर, सचिन सातपुते, सोमनाथ डोके, गोविंद केंद्रे, गंगाधर कोतकर, महीला पोलीस शिपाई धनश्री डोके, पोलीस पाटील खोकराळे या पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून हिवरे तर्फे नारायणगाव, धनगरवाडी इत्यादी ठिकाणी छापे टाकून एकूण १२,८०० रुपये किमतीची १६० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली असून दारू विक्री करणारा आरोपी मारुती साळवे रा. हिवरे तर्फे नारायणगाव यास अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *