मानवी हक्क संरक्षण आणि जागृती व गुणवंत कामगार कल्याण मंडळच्या वतीने राष्ट्रीय सुरक्षा सुरक्षा सप्ताह निमित्त पटनाट्य ,रॅलीद्धारे, भितीपत्रके वाटून जनजागृती

पिंपळे गुरव ,नवी सांगवी येथील कृष्णा चौक, साई चौक, या ठिकाणी 52व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह दिनानिमित्त रॅली काढून पटनाट्यद्वारे, स्लोगन द्वारे ,स्पीकर द्वारे जनजागृती करण्यात आली. यामध्ये आण्णा जोगदंड म्हणाले की हा जन्म परत नाही, घरी कोणीतरी आई ,वडील, बहिण, मुले ,पत्नी हे आपले वाट बघत आहेत याचा विचार करून सुरक्षितता बाळगावी. स्लोगन मध्ये वाहनांचा अति वेग, मध्यम प्राशन करून वाहन चालवणे, वाहन चालकावरील अति कामाचा तान, अज्ञान, लेन कटिंग, ओव्हरटेक, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी अशा विविध कारणामुळे अपघात होतात.

म्हणून आवरा वेगाला, सावरा जिवाला.सेफ्टी होल्ड लाईफ इज गोल्ड, मत करो मस्ती,जिंदगी नही सस्ती. जो चुकला नियमाला, तो मुकला जीवनाला. गाडी चालवताना मारू नका गप्पा, नाहीतर जीवनाचा होईल शेवटचा टप्पा .आपली सुरक्षा आपल्या परिवाराची सुरक्षा, वेग कमी, जीवनाची हमी, सफर मे कितनी कम हो दुरी, हेल्मेट लगाना है जरुरी. आपला जीव सांभाळा ,दुर्घटना व अपघात टाळा. आयुष्य सुंदर आहे चांगल्या गोष्टींनी भरलेल्या आहेत याचा विचार करा अशा विविध प्रकारचे स्लोगनद्धारे, पत्रके वाटून ,पटनाटायातून जनजागृती करण्यात आली.
यावेळी जोगदंड म्हणाले की 99% अपघात एकाग्रता नसल्याने 60%अपघात अतिवेगाने आणि मानवी चुकामुळे होत असतात,18%अपघात पादचारी संबंधित आहेत तर देशात दर 4.61लाख अपघात होतात .राज्याचा देशात तिसरा क्रमांक लागतो जगाच्या लोकसंख्येच्या17%अपघात भारतात होतात .29 प्रकारचे अपघात अति विश्वासाने होतात. अशा पकारच्या घोषणा देऊन , स्लोगन द्वारे ,पटनाटया सादरीकरण करून जनजागृती करून सुरक्षेतेची शपथ आण्णा जोगदंड यांनी दिली.


यावेळी संस्थाध्यक्ष विकास कुचेकर शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, महिला शहराध्यक्षा मीना करंजावणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, सचिव गजानन धाराशिवकर मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार,निलेश हंचाटे सह गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे शहराध्यक्ष मुलानी महमदशरीफ,संचालक भरत शिदे ,रवींद्र चव्हाण, काळुराम लांडगे सह,वाहतूक विभाग सागवीचे पी.एस.आय.संजय कामटे, अनंत यादव,गणेश वाडेकर, सुरेश सकट, बाळासाहेब साळुंके,प्रदिप बोरसे,प्रकाश वीर,रवींद्र तळपदे,दत्तात्रय अवसरकर,शंकर नानेकर,विकास कोरे.पोलीस मित्र राजेंद्र कुवर,निखिल कुमावत,विठ्ठल पाटील, संतोष ढमनगे, नितीन ढमनगे,सा.मा.किसन फसके,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *