तब्बल १७ वर्षांनी पुन्हा भरला वर्ग ;विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींनी वातावरण अगदी भावनिक

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ

आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयात सन २००६/०७ वाणिज्य शाखा विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा व शिक्षक कृतज्ञता सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात माजी विद्यार्थी संघटना व कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश कैलास काळे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी.ए.वाल्हेकर सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद घोडेकर यांनी केले. सूत्रसंचालनाचे काम सुरज सोनावळे व अश्विनी फलके यांनी पाहिले.
माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते रोपटे व पुस्तक देवून मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमात मान्यवर,शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
१७ वर्षांनी पुन्हा भेटणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींनी वातावरण अगदी भावनिक झाले होते.
प्रा.बी.एम. पवार, डॉ.बी. व्ही. गव्हाळे, डॉ.व्ही एस करंदीकर,प्रा.जोशी,विनोद काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
माजी प्राचार्य डॉ.आय.बी जाधव व प्रो.पी.आर. मोकळ सरांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
जुनी छायाचित्रफित पाहताना कित्येकांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते.
माजी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयास शुद्ध पिण्याच्या पाण्याचा वॉटर डीस्पेंसेर भेट म्हणून देण्यात आला.
सदर कार्यक्रमास तुकाराम काळे, किरण घोडेकर,मुरलीधर काळे, महेश काळे,नरेंद्र काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आभार गिरीश घोडेकर यांनी मानाले. सुरुची भोजन, गप्पा टप्पा,जुने खेळ खेळत सदर कार्यक्रमाची सांगता झाली.
या स्नेह मेळाव्याचे नियोजन माजी विद्यार्थी निलेश जंगम, जमीर मुंढे मनोज काळे,मिन्नाथ झोडगे,अपर्णा निघोट व प्रशांत मंडलिक यांनी पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *