शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळाचे सर्व क्रीडा शिक्षक कोरोना काळात लॉक डाऊन असताना गरिबांसाठी अन्नदान करून धावले मदतीला…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिपरी चिंचवड – दि १५ मे २०२१
कोरोनाचा वाढत उद्रेक पाहता सर्वच सामाजिक संघटना कोणत्या ना कोणत्या मार्गाने कोरोना बधितांना मदत करताना दिसत आहेत. कोण्ही रक्तदान तर कोण्ही प्लाझ्मा दानातून मदत करत आहेत. तर कोण्ही औषधे आणि कोरोना काळात PPE किट, मास्क, हॅन्डग्लोवज, स्यानेटायजर वाटप करून मदत करत आहेत.


सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे आणि लॉकडाऊन मुळे अनेक रेल्वेस्टेशनवर, एस टी स्थानकात गरिबांची उपासमार होत आहे. त्याकरता माणुसकीचे दर्शन घडवत महामंडळाच्या माध्यमातून या गरीब व ज्यांना खरेच गरज आहे अशा लोकांसाठी पुढे येऊन त्यांना एक वेळेचे जेवण देण्यात यावे अशी संकल्पना महामंडळाचे संस्थापक संचालक निवृत्ती काळभोर व महामंडळाचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी सर्वांसमोर मांडली व या उपक्रमात सर्व शिक्षकांनी मदतीचा हात पुढे केला आणि आकुर्डी रेल्वे स्थानक येथे अन्नदान करण्यात आले.

किमान ५०० गरीब लोकांना मंडळाच्या या उपक्रमातून दिनांक १४ मे ते २४ मे २९२१ पर्यत साय ६.०० वाजता अन्नदान करण्यात येणार असून यासाठी महामंडळाचे सचिव महादेव पफाळ , हनमंत सुतार, सुजाता चव्हाण, रफिक इनामदार, चंद्रकांत पाटील, किर्ती मोटे, अर्चना सावंत ,उमा काळे,

राजू माळी , पोपट माने ,विष्णुपंत पाटील, बाळासाहेब हेगडे ,निळकंट कांबळे, प्रतिमा शितोळे, हर्षदा नळकांडे ,राम मुदगल ,आशिष मालुसरे ,राजा प्रसाद , शिदे सर रंणखांबे सर, मनीषा पाटील,अजित गायकवाड, रवि पिल्ले, निखिल पवार आदी क्रीडा शिक्षकांनी व इतर सहकाऱ्यांची यात आर्थिक मदत देऊन सक्रिय सहभाग नोंदवला.
मंडळाने माणुसकीचे दर्शन घडवले.
या उपक्रमाचे महापौर माई ढोरे, क्रीडा सभापती उत्तम केंदळे यांनी फोन करून शाबासकीची थाप दिली.
शहरातही या उपक्रमाचे कौतुक होताना दिसत आहे.