विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे-Api किरण भालेकर

महाळुंगे पडवळ –
आबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी

(ता.आंबेगाव) दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना आत्मविश्वास बाळगावा , आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावे,विद्यार्थ्यांनी कसे जगावे,आपल्या व्यक्तिमत्व विकास कसा करावा, त्याचबरोबर किशोरवयात नकळत होणाऱ्या चुका व त्यांची दुरुस्ती याविषयीची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांनी दिली.
रयत शिक्षण संस्थेचे महाळुंगे पडवळ ता आंबेगाव येथील हुतात्मा बाबू गेनू विद्यालय येथे इयत्ता दहावी व इयत्ता बारावी शुभेच्छा चिंतन समारंभ कार्यक्रमत ते बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य लक्ष्मणराव थोरात, सरपंच सुजाता सचिन चासकर,उपसरपंच विकास पडवळ,बी.टी.आवटे, प्रा बबनराव पडवळ, डॉ.रंगनाथ चासकर, शिवराम चासकर आदी उपस्थित होते.
विद्यार्थिनी वैष्णवी चिखले, भक्ती भालेराव,आदिती चासकर, वैष्णवी डोके यांनी मनोगते व्यक्त करत इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत प्रवास तसेच विद्यार्थी रम्य आठवणी उलगडून दाखवल्या. कार्यक्रमाचे नियोजन नितीन बाणखेले, किरण गाढवे, राजकुमार गायकवाड यांनी केले. विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन ज्ञानेश्वर निमोणकर व मल्हारी थोरात यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *