आम्हालाही विमा संरक्षण मिळावे! सर्पमित्रांची मागणी…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपळे गुरव- दि १३ ऑगस्ट २०२१
नागपंचमीचे आचित्य साधून पिंपरी चिंचवड येथील दिलासा संस्था , महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, अक्षरभारती पुणे या संस्थांच्या वतीने सर्पमित्रांचा सन्मान गुरुवार दिनांक १२ ऑगस्ट २०२१ रोजी हरी ओम निवास पिंपळे गुरव येथे सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पिंपरी चिंचवड शहरातील कार्यरत सर्पमित्र दीपक शर्मा ( पिंपळे गुरव) राजू कदम ( भोसरी) अमर गोडांबे ( भोसरी) यांचा यथोचित सन्मान सावित्रीच्या लेकींचा मंचच्या अध्यक्ष रविना आंगोळकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, डॉ.पी एस आगरवाल, चैताली चव्हाण, निशिकांत गुमास्ते, आत्माराम हारे, शामराव सरकाळे, मुरलीधर दळवी, सुंदर मिसळे उपस्थित होते.
सर्पमित्र राजू कदम यावेळी म्हणाले–“सर्पमित्र म्हणून आम्ही पिंपरी चिंचवड शहरात गेल्या १५ वर्षांपासून काम करीत आहोत. धाडसी वृत्तीने काम करताना सर्पमित्रांच्या जीवाला धोका असतो व काही बरे वाईट झाले तर किमान विमा संरक्षणाचे कवचकुंडल मायबाप सरकारने आम्हाला द्यावे. जिथे जिथे साप निघतात तिथे आम्ही जातो. साप पकडतो. त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडतो”
दीपक शर्मा यांनी विषारी साप आणि बिगरविषारी साप याची सखोल माहिती दिली. सापांचे आम्ही मित्र आहोत अन माणसांचेही मित्र आहोत असे सांगितले. भाग्यश्री कंक, प्रथमेश जगदाळे, मीरा कंक यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात परिश्रम घेतले.
दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी सूत्रसंचालन केले. भाऊसाहेब गायकवाड यांनी आभार मानले.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *