बी.डी.काळे महाविद्यालयास भिमाशंकर करंडक 2024 चे विजेतेपद मिळाले

आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी

येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयास भिमाशंकर करंडक 2024 चे विजेतेपद मिळाले आहे.महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा.ना. दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून, तसेच राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्राच्या संचालिका मा.पूर्वाताई वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनातून,ॲड.राहुल पडवळ यांच्या अथक परिश्रमातून भिमाशंकर करंडक आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाचे यशस्वी आयोजन भव्य दिव्य स्वरूपात मंचर येथे नुकतेच संपन्न झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलात्म अभिव्यक्तीसाठी हक्काचे मुक्त व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उदात्त ध्येयवादातून भिमाशंकर करंडकच्या बाराव्या पर्वाचे याही वर्षी दिमाखदारपणे आयोजन संपन्न झाले.भिमाशंकर करंडक 2024 च्या युवक महोत्सवामध्ये बी.डी.काळे महाविद्यालयास
पहिल्यांदाच भिमाशंकर करंडक 2024 चे विजेतेपद मिळाले आहे.भिमाशंकर करंडक व रोख
पारितोषिक रु.51000/- असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. वैयक्तिक व समूह स्पर्धेतील पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेब,सिनेअभिनेते श्री.उपेंद्र लिमये,श्री.जितेंद्र जोशी,सिनेअभिनेत्री भाग्यश्री मोटे,मा.पूर्वाताई वळसे पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
या विजेतेपदासाठी सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ. चांगुणा कदम,विद्यार्थी विकास मंडळाचे चेअरमन प्रा.कैलास उंबरे,प्रा.डॉ.गुलाबराव पारखे, प्रा.डॉ.पुरुषोत्तम काळे, कोरिओग्राफर श्री.विशाल थोरात या सर्वांनी मार्गदर्शन केले आहे.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.तुकाराम नामदेवराव काळे,उपाध्यक्ष व खजिनदार श्री.शामशेठ होनराव,सचिव श्री. अक्षय काळे,कार्याध्यक्ष श्री. राजेश काळे,न्यू इंग्लिश स्कूल मिडियमचे चेअरमन श्री. बाळासाहेब काशिनाथ काळे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड.मुंकुदराव काळे, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक, सल्लागार आणि प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर, उपप्राचार्य डॉ.बाळासाहेब गव्हाळे,अधिक्षक श्री.अशोक काळे,श्री.गणेश काळे, श्री. विनोद काळे इ.नी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. विजेतेपदाच्या बहुमानामुळे महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.यापूर्वी महाविद्यालयास दोन वेळेस उपविजेतेपदाचा बहुमान मिळालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *