राम ग्रामीण पतसंस्थेकडुन १२% लाभांश…

आंबेगाव ब्युरोचिफ मोसीन काठेवाडी
घोडेगाव येथील अग्रगण्य असणाऱ्या राम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२७ मार्च २०२० रोजी ऑनलाईन पद्धतीने पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ,सर्व नियम पाळुन हि सभा पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री संतोष काळे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. पतसंस्थेकडे ११ कोटी ८ लाख रुपयांच्या ठेवी असून सदर आर्थिक वर्षामध्ये १० कोटी १७ लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे.
त्याचप्रमाणेचालु आर्थिक वर्षामध्ये २२ लाख रुपये नफा या संस्थेला झाला असून ऑडिट “अ” वर्ग मिळालेला आहे. अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शनी कर्पे यांनी दिली. या ऑनलाईन सभेसाठी उपाध्यक्ष अक्षय काळे संस्थेचे संचालक पांडुरंग कर्पे,दत्तात्रय काळे, विनोद गुप्ता,महेश बोर्हाडे हे मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे उपाध्यक्ष श्री अक्षय काळे यांनी ऑनलाईन पध्दतीने उपस्थित असणाऱ्या सभासदांचे आभार मानले.
सभेचे प्रास्ताविक व अहवाल वाचन श्री सतीशराव जाधव यांनी केले.