सांगली मिरज आणि कुपवाड शहराच्या मदतकार्यासाठी महापालिकेचे पथक रवाना – महापौर उषा उर्फ माई ढोरे

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी चिंचवड दि . २७ जुलै २०२१
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळून झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आल्याने नागरीवस्तीत व नगरांमध्ये पुराचे पाणी शिरुन जनजिवन पुर्णत : विस्कळीत झाले आहे तसेच सांगली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पूरस्थिती निर्माण होवून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . सद्यस्थितीत पुरस्थिती ओसरली असुन तेथील उपाययोजना व मदतकार्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी व स्वंयसेवकांचे पथक आज दि . २७ जुलै रोजी सायंकाळी सांगलीकडे रवाना होणार असल्याची माहीती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली . सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहर व जिल्ह्यास पूरपरिस्थितीचा सामना करावा लागत आहे . पाणी ओसरत जाईल त्याप्रमाणे महानगरपालिकेमार्फत शहराची स्वच्छता व आरोग्य विषयक उपाययोजना करण्यास सुरवात झालेली आहे . सदर परिस्थितीवर उपाययोजना व मदतकार्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत सहाय्यक आयुक्त श्री . बाळासाहेब खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली विविध संयंत्रे व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे . या पथकामध्ये ०४ अधिकारी , ७० कर्मचारी तसेच अंदाजे ३० स्वयंसेवक यांचा समावेश असुन सदर पथक साहित्य व उपकरणासहित मदतकार्यासाठी आज दि . २७/०७/२०२१ रोजी संध्याकाळी सांगलीकडे रवाना झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *