जुन्नर येथे ७० पर्यटकांना आग्या मोहोळाच्या मधमाशांनी घेतला चावा…

जुन्नर येथे ७० पर्यटकांना आग्या मोहोळाच्या मधमाशांनी घेतला चावा

जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश

जुन्नर दि. १८ (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
लेणी संवर्धक चळवळीच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील विविध लेण्यांची साफसफाई करण्यासाठी तसेच तेथे असलेली पुरातन माहिती व लेण्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी पुण्याहून काही बौद्ध संघटनांचे सुमारे सव्वाशे कार्यकर्ते पदाधिकारी जुन्नर जवळील बौद्ध लेण्या समुह पाहण्यासाठी आले होते. यावेळी यातील ७० पर्यटकांना आग्या मोहोळाच्या मधमाशांनी चावा घेऊन त्यांना जखमी केले. ही घटना आज दुपारी तुळजा लेणी समुहाजवळ घडली.


दरम्यान जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. जखमीं पैकी यातील चौघांची प्रकृती गंभीर झाली होती तर एक जणाचे ब्लडप्रेशर वाढले होते. मात्र जुन्नर ग्रामीण रुग्णालयात योग्य उपचार घेतल्यानंतर त्या रुग्णांना बरे वाटू लागले आहे. काहीजणांना उपचार करून बरे वाटल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. अशी माहिती पर्यटकांसोबत व सहली सोबत आलेले कार्यकर्ते सागर कांबळे यांनी दिली.


दरम्यान बुद्ध लेण्या मुक्त आंदोलन समिती, पुणे यांच्या वतीने बुद्ध सहलीचे आयोजन करण्यात आले होते. शासनाचा पुरातत्व विभाग बुद्ध लेण्या कडे दुर्लक्ष करत असल्यामुळे तेथील लेण्यांची साफसफाई करण्यासाठी तसेच तेथील माहिती जाणून घेण्यासाठी पुणे येथून आज बुद्ध सहल आयोजित करण्यात आली होती. जुन्नर मध्ये असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात जास्त लेण्या म्हणजेच ३५० लेण्या असल्याने येथे देश परदेशातून बौद्ध भिक्षू व पर्यटक नेहमी येत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *