शिरूरच्या घोडगंगा स सा कारखान्याचे कामगार संतप्त : चिमणीवर उंच ठिकाणी चढून इशारा

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे असणाऱ्या रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना यंदाच्या गळीत हंगामात बंद असुन, गेली १५ महिन्यांपासून कामगारांना पगार मिळालेला नाही. त्यातच कारखाना प्रशासनाने अचानकपणे कामगार एन्ट्री चे पंचिंग मशीन बंद केल्यामुळे, सर्व कामगार कारखान्याच्या गेटवर जमा होऊन आज शुक्रवार दि. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी कामगारांनी टोकाची भूमिका घेतलीय. यात युनियन अध्यक्ष तात्यासाहेब शेलार, संतोष तांबे व महेंद्र काशीद हे कोजन प्रकल्पाच्या चिमणीवर चढून प्रशासनाच्या बाबतीत नाराजी व्यक्त करीत आहेत. तसेच जर आमच्या जीवाला काही कमी जास्त झाले, तर त्याला पूर्णतः कारखाना प्रशासन जबाबदार असेल अशी टोकाची भूमिका त्यांनी घेतलीय.
कारखान्याचे एमडी यांनी अचानकपणे पंचिंग मशीन बंद केल्यामुळेच हा उद्रेक झाल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.


यावेळी या कामगारांना खाली उतरवण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराएम गुंजवटे, घोडगंगाचे विद्यमान संचालक दादा पाटील फराटे, शिरूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवी बापू काळे, घोडगंगाचे माजी संचालक सुधीर फराटे, भाजपचे जिल्ह्याचे नेते राजेंद्र कोरेकर, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश कार्यकारीणी सदस्य सुभाष कांडगे, श्रीगोंदा साखर कारखान्याचे संचालक श्रीनिवास घाडगे, एकनाथ शेलार, राजेंद्र गारगोटे, पत्रकार भोईटे, पत्रकार गायकवाड, व शिरूर पोलीस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी, त्याचप्रमाणे अग्निशामन दलाचे जवान व कारखान्याचे अनेक कामगार याठिकाणी थांबून त्यांना विनंती करत आहेत. परंतु संध्याकाळी उशिरापर्यंत कामगार ऐकायला तयार नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *