ओझर अष्टविनायक रोडवरील कारखाना फाटा दिवसें दिवस बनत आहे अपघात प्रवण क्षेत्र..

ओझर प्रतिनिधी :- मंगेश शेळके
ओझर अष्टविनायक रोडवरील कारखाना फाटा चौकात गेल्या महिनभरात पाच ते सहा चित्र विचित्र असे अपघात झाले.   या अपघातामध्ये    पर्यटकांची,जिवीतहानी ,वित्तहानी ,आर्थिक ,मानसिक व शाररिक हानी झाली.दिवसेंदिवस हा कारखाना फाटा अँक्सीडेंटचा स्पाँट बनत चाललेला आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिक व व्यापारी वर्ग घाबरलेल्या अवस्थेत आहे. व या सर्वांनी ह्या कारखाना फाटा चौकात लवकरात लवकर चारी बाजूंना स्पीड ब्रेकर व दिशा-दर्शक फलक व सी.सी.टिव्ही कँमेरा बसवण्याची मागणी रोडचे काँट्रक्टर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वर्ग यांच्याकडे केली आहे. तसेच ,जर लवकरात लवकर हे स्पीड ब्रेकर व दिशादर्शक फलक बसविण्यात आले नाही तर तीव्र रोड आंदोलन करण्याचा ईशारा यावेळी ग्रामस्थ व व्यापारी वर्गाने यावेळी दिला.

तसेच ह्या अष्टविनायक हायव रोडवरून येणाऱ्या – जाणाऱ्या पर्यटकांनी व लोकांनी  गाडयांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचा सल्लाही व्यापारी वर्गाने ह्यावेळी दिला.ह्या रोडवरील स्पीड ब्रेकरच्या संदर्भात अष्टविनायक रोडचे काँट्रक्टर सोपान बेल्हेकर यांच्याशीही येथील स्थानिक नागरिक व व्यापा्री वर्गाने चर्चा केली.व श्री. बेल्हेकर यांनीही सर्व मागण्या लवकरात लवकर पुर्ण करण्याचा व्यापारी वर्गाला  आश्वासन दिले. ,ह्यावेळी धनगरवाडी गावचे नवनिर्वाचित सरपंच महेश शेळके ,उपसरपंच राजेंद्र शेळके ,धालेवाडी गावचे उपसरपंच सुभाष दळवी  गोविंद गावडे ,राजेंद्र खिलारी, श्री.शिंगोटे ,संकेत घुले ,विलास शेळके,विकास नाना ,महेश मोढवे ,कराळे गुरुजी , मच्छिंद्र शेळके , राजेंद्र नामदेव शेळके ,ईश्वर शेळके ,रमेश पाटोळे ,दौलत शेळके , श्री. राऊत व सर्व स्थानिक ग्रामस्थ ,गावकरी ,व्यापारी वर्ग व पत्रकार बंधू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *