आंबेगाव तालुक्यात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये घड्याळाचे वर्चस्व

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
२० सप्टेंबर २०२२

घोडेगाव


आंबेगाव तालुक्यात झालेल्या १८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये १४ ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस, ३ शिंदे गट तर १ भाजपाच्या ताब्यात असल्याचा दावा संबंधीत पक्षांनी केला आहे. १८ पैकी १४ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामपंचायतींमध्ये आंबेगाव गावठाण, थोरांदळे, गंगापुर बुद्रुक, पिंपळगाव तर्फे घोडा, राजपुर, माळीण, शिनोली, आसाणे, कोंढवळ, ढाकाळे, पोखरी, जांभोरी, तिरपाड, फदालेवाडी / उगलेवाडी यांचा समावेश आहे तर शिवाजीराव आढळराव पाटील पुरस्कृत शिंदे गटाकडे वडगांव काशिंबेग, पंचाळे बुद्रूक, वाळुंजवाडी यांचा समावेश आहे तर भाजपाकडे राजेवाडी ग्रामपंचाय असल्याचा दावा संबंधी पक्षांनी केला आहे.

निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींचे नाव, निवडणूक आलेलया सरपंचाचे नाव व सदस्यांची नावे पुढिल प्रमाणे – शिनोली सरपंच मंगेश सखाराम पारधी, सदस्यपदी मिरा तुकाराम काळे, सुवर्णा अरूण सरोदे,संतोष बबन बो-हाडे, निता गंगाराम काळे, केशव लक्ष्मण कडाळे, सुजाता लहु बो-हाडे, रविंद्र बच्चु पवार,आशा गणेश सोमवंशी, शकुंतला सुदाम काळे, सुनिल सोमा काळे, गणेश चंद्रकांत बो-हाडे पिंपळगांव तर्फे घोडा सरपंच सायली ज्ञानेश्वर लाडके, सदस्यपदी मनिषा संजय लोहकरे, दिलीप सावळेराम काळे, अश्विनी संतोष पोखरकर, निशा विष्णु बो-हाडे, प्रसाद विठ्ठल जोशी, सायली ज्ञानेश्वर लाडके, अश्विनी प्रफुल्ल लाडके, लक्ष्मण पांडुरंग वागदरे, प्रविण बाळासाहेब ढमढेरे पंचाळे बुद्रूक सरपंच संगिता सुरेश किर्वे, सदस्यपदी समिर मच्छिंद्र गारे, पुजा राजु गोनटे, दिपाली राजेंद्र भालेराव, सविता तानाजी जढर, सुरेश नामदेव किर्वे, रामचंद्र दगडु तारडे तर एक जागा रिक्त राहिली. राजपुर सरपंच चंद्रकांत दगडु लोहकरे, सदस्यपदी प्रकाश राहु लोहकरे, कमल ज्ञानेश्वर लोहकरे, ठकुबाई रघुनाथ शेळके, गोरक्षनाथ भिमा वायाळ, प्रविण लक्ष्मण उंडे, मोनिका गोटिराम लोहकरे तर एक जागा रिक्त ढाकाळे सरपंच धोंडिबा दारकु लांघी, सदस्यपदी अक्षय शांताराम जंगले, ज्योती सागर काळे, विजय विठ्ठल अंकुश, भारती ईश्वर डामसे, सविता जगन काळे, एकनाथ नंदाराम सुपे तर एक जागा रिक्त राहिली.

तिरपाड सरपंच सोमा भिमा दाते सदस्यपदी सारिका शंकर पारधी, देवकाबाई देवराम हिल, नामदेव गिरजु दाते, सिताराम देवजी गवारी, दिपक बाबु मेमाने, विमल रामचंद्र गवारी, शैला धोंडू आंबवणे, दत्तु सखाराम आंबवणे तर एक जागा रिक्त राहिली गंगापुर बुद्रुक सरपंच मंगल चिंतामण केदारी, सदस्यपदी सारिका राजेंद्र केदारी, संतोष महादेव भवारी, शोभा गणेश लोहोट, कविता राहुल केदारी, कोमल धनंजय येवले, संदिप प्रभाकर येवले, निलम दत्तात्रय लोहोट, लक्ष्मण आबाजी कोंढावळे, बाळु दत्तात्रय आवटी पोखरी सरपंच हनुमंत सोमाजी बॅढारी, सदस्यपदी दिपक बबन भागित, आदिनाथ चिंधु भेंडारी, पार्वता बाळु बेंढारी तर एकुण चार जागा रिक्त राहिल्या. माळीण सरपंच रघुनाथ दगडु झांजरे, सदस्यपदी नामदेव पुनाजी असवले, रेवुबाई चंद्रकांत असवले, प्रमिला मच्छिंद्र लेंभे, भामाबाई हरिश्चंद्र झांजरे, शिवाजी विठ्ठल लेंभे, हेमा नामदेव भालचिम, कविता चंद्रकांत मोहांडुळे कोंढवळ सरपंच सविता काळु कोकाटे, सदस्यपदी लक्ष्मी दत्तात्रय लोहकरे, सुरेखा विनायक लोहरके, नितीन दुंदा लोहकरे, सविता रमेश दाते, इंदुबाई नामदेव कवटे, नामदेव पांडुरंग कोंढवळे, यशोदा बाळु कोंढवळे, शंकर दारकु केदारी, सागर ज्ञानेश्वर कोकाटे जांभोरी सरपंच सुनंदा विठ्ठल पारधी सदस्यपदी मनिषा अंकुश केंगले, श्वेता किसन गिरमे, बबन किसन केंगले, नानुबाई चंद्रकांत साबळे, लता शांताराम केंगले, सुनिल बबन पारधी, भोराबाई मारूती केंगले, शिवराम नामदेव केंगले, दुंदा लक्ष्मण कोकोटे उगलेवाडी/फदालेवाडी सरपंच विनोद वसंत उगले, सदस्य विलास गेणभाव उगले, सुरेखा सुनिल फदाले, उज्वला बाळासाहेब तातळे, भरत मारूती फदाले, स्वाती लक्ष्मण भवारी, सचिन ज्ञानेश्वर उगले, मंगल सुभाष शिंगाडे आंबेगाव गावठण सरपंच प्रमिला गणेश घोलप, सदस्य युवराज बबन तारडे, अनिता सचिन विरणक, विजय गेणभाव घोलप, विनोद सुनिल काठे, परविन राजु पानसरे, पुनम कुमार घोलप, मिलींद रमशे भांगरे वाळूजवाडी सरपंच नवनाथ चिंतामण वाकुंज, सदस्य रक्मिणी पुनाजी खंडागळे, सुवर्णा संतोष चौगुले, कांताराम सोमा कडाळे, यशोदा मारूती वाळुंज, मयुर जिजाबा गायकवाड, संदिप सुदाम पवार, सोनाली सुनिल वाळुंज वडगांव काशिंबेग सरपंच सौरभ संभाजी पोखरकर, सदस्य सुजाता विजय भुते, आशा नामदेव वाळुंज, योगेश विजय पिंगळे, कल्पना राजु कडधेकर, सुप्रिया बाळासाहेब पिंगळे, गणेश लक्ष्मण खिरड, भाउ दत्तात्रय डोके, रेश्मा संदिप दैने, सुजाता संजय वायकर, थोरांदळे ग्रामपंचायत सर्व बिनवीरोध झाली. यामध्ये सरपंचपदी जिजाभाऊ ज्ञानेश्वर टेमगिरे, सदस्यपदी संजय वसंत टेमगिरे, रोहिणी योगेश टेमगिरे, नितीन नारायण फुटाणे, चंद्रकला दत्तात्रय बारवकर, यमुना धनंजय टेमगिरे, संदिप विलास टेमगिरे, अलका मधुकर विश्वासराव, मनिषा संजय मिंढे, विक्रम विठ्ठल टेमगिरे निवड झाली. राजेवाडी ग्रामपंचायत सर्व बिनवीरोध झाली. यामध्ये सरपंचपदी शुभांगी निलेश साबळे, सदस्यपदी दत्तात्रय यशवंत शिंदे, मंदा सुनिल गभाले, सुनिल सखाराम उंडे, गणेश काशिनाथ म्हसळे हे बिनवीरोध तर तीन जागा रिक्त राहिल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *